खानदेशजळगावा जिल्हाधरणगावमहाराष्ट्रराजकीय

धरणगावात जलक्रांतीची गती; ३१० किमी नाले-नदीपात्र खोलीकरण मोहिमेला वेग… मंत्री गुलाबराव पाटलांकडून पाहणी…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यात जलसंधारणाच्या दिशेने मोठी पावले उचलण्यात येत असून जवळपास ३१० किलोमीटर नाले आणि नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे अवघ्या दीड महिन्यातच ३५ किलोमीटरपेक्षा अधिक काम पूर्ण झाल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग आला आहे. या कामांची आज प्रत्यक्ष पाहणी मंत्री गुलाबराव पाटलांकडून करण्यात आली तसेच साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजनही करण्यात आले.या प्रकल्पासाठी देशातील मोठ्या नदीजोड प्रकल्पांवर काम केलेल्या “यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी”मार्फत अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक नाल्याचा नैसर्गिक उतार, जलप्रवाह आणि साठवण क्षमता लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने आणि नियोजनबद्ध रीतीने काम सुरू करण्यात आले आहे.संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी पूर्णतः CSR माध्यमातून उभारण्यात येत आहे. GPS ग्रुप, जैन इरिगेशन, मेघा इंजिनिअरिंग तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने प्रशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ही व्यापक जलचळवळ आकार घेत आहे.शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे भूजल पातळीत वाढ होऊन शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात उन्हाळ्यातही शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता राहावी, गावोगावी विहिरी जिवंत राहाव्यात आणि पाणीटंचाई दूर व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button