बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सुजाता कादंबरी नसती तर जगाला बुद्ध मिळालेच नसते,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण

बुलढाणा- सुजाता कादंबरी नसती तर जगाला बुद्ध मिळालेच नसते. अशी प्रतिपादन माजी आमदार सौ .रेखाताई खेडेकर यांनी केले . प्रा. बी .ए. खरात लिखित बुद्धकालीन संदर्भ असलेल्या ऐतिहासिक सुजाता या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर पंचशील बुद्धविहार गजानन नगर चिखली येथे हा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जनशील कवी तथा सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य डॉ. गोविंद गायकी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर , प्राचार्य डॉ.विजय नागरे, डॉ .सुभाष राऊत, डॉ .डी .एन. जाधव, प्रा. डी .एम. कानडजे तसेच सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी आर. के. मोरे हे उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. स्वागतानंतर कु. समीक्षा मोहन खरात हिने सादर केलेल्या भावगीताने वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविंद्र सावळे यांनी केले, यावेळी बोलताना शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की. उपलब्ध साहित्यावर ऐतिहासिक कादंबरी लिहिणे सोपे असते. मात्र विविध संदर्भ गोळा करून उपलब्ध नसलेल्या इतिहासाला शब्दबद्ध करणे ही मोठी साहित्य सेवा आहे, प्रा. खरात यांचे यासाठी अभिनंदन केले पाहिजे. प्रा बी.ए .खरात यांनी संत तुकाराम महाराजांच्या कुमुदिनी काय जाणे तो परिमळ….. या अभंगाचा दाखला देत कलावंत आणि रसिक यांचे अतूट नाते स्पष्ट केले. प्राचार्य डॉक्टर विजय नागरे यांनी सुजाता ही कादंबरी विद्यापीठातील 400 महाविद्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, डॉ .सुभाष राऊत यांनी प्रा .खरात यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातातून आणखी साहित्यनिर्मिती घडो अशी भावना व्यक्त केली,
प्रा.खरात यांच्या कन्या सौ.प्रतिमाताई मनीष मोरे यांनी ‘सुजाता ‘कादंबरीचा आपल्या मनावर झालेला प्रभाव व्यक्त करत नुकत्याच जन्मलेल्या नातीचं नावही सुजाता ठेवल्याचे सांगितले, या कार्यक्रमाला प्रा .बी .ए. खरात यांच्यावर प्रेम करणारे रसिक ,साहित्य प्रेमी, व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष मोरे, भारत जाधव, नरेंद्र पवार, बबन पवार, बाळू कासारे ,युवराज दाभाडे, सुमेध जाधव, राजेश बोर्डे ,प्रवीण खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button