बुलढाणा

कन्यादान करत असताना वधूपित्याचा मंडपातच मृत्यू .वर्डदी गावावर शोककळा,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधि – प्रशांत चव्हाण

बुलढाणा – मुलीच्या विवाह सोहळ्यात कन्यादान विधी सुरू असताना . हृदय विकाराच्या झटक्याने वधूपित्याचा मंडपताच मृत्यु झाल्याची दुःखद घटना वर्दडी बुद्रुक ( ता सिंदखेड राजा ) या गावात बुधवारी 12 मे रोजी सायंकाळी 5 वजेच्या दरम्यान घडली ,
या घटनेमुळे विवाह सोहळ्याचे आनंदी वातावरण दुःख सागरात बुडाले ,मुलीच्या पाठवणी पूर्वीच वधू पित्याला भर मंडपात मृत्युने असे गाठल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, कुरुमदास कुंडलिक भुतेकर ( वय 51) हे मृत व्यक्ती चे नाव आहे . कुरुमदास भूतेकर यांची कन्या नंदिनी हिचा विवाह सोहळा आर्डा तोलाजी ( जिल्हा जालना ) येथे नानोटे परिवारातील वराशी वरुडी बुद्रूक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सायंकाळी नववधू नंदिनी हीची सासरी पाठवण्या पूर्वी मंडपात कन्यादान विधी सुरू होता .याच वेळी वधूपिता कुरूमदास यांच्या छातीत तीव्र कळ लागल्याने ते जागीच कोसळले . हा हृदय विकाराचा झटका आल्याचे स्थानिकांना कळले . कूरुमदास यांना तात्काळ सिंदखेडराजा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे विवाह सोहळ्यात आनंदी वातावरणात दुःखाचे सावट पसरले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button