जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली येथे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली असून स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंतुर्ली आऊटपोस्टची कामगिरी समाधानकारक नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावात सध्या अवैध धंद्यांचे जाळे वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन सट्टा पिढ्या, गावठी दारू विक्री, ताडी तस्करी, गांजा विक्री तसेच चार पत्ता क्लब आणि दोन बेकायदेशीर कॅसिनो सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व प्रकारांकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, मागील सहा महिन्यांत गावात पाच घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यांचा तपास अद्याप शून्य असल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच भर दिवसा दोन घरांतून सुमारे दोन लाख रुपयांची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या वेळी गावात पोलीस गस्त नसल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे. उशिरापर्यंत गावात मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. बाहेरगावाहून येणाऱ्या संशयित व्यक्तींमुळे आणि अवैध धंद्यांमुळे गावातील वातावरण अधिकच बिघडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

काही वादविवादाच्या घटनांमध्ये अवैध धंदे चालवणारेच मध्यस्थी करत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत असून, “पोलीस आणि अवैध धंदे चालक यांच्यात संगनमत आहे का?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सामान्य नागरिकांना या धंद्यांशी काहीही देणे-घेणे नसून, त्यांना केवळ सुरक्षिततेची अपेक्षा आहे. मात्र तीच मिळत नसल्याने भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

तत्काळ उपाययोजनांची मागणी गावात नियमित पोलीस गस्त वाढवावी, अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी आणि घरफोडीच्या घटनांचा तातडीने तपास करून गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button