जळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी हकीम आर. चौधरी, सचिवपदी विजयजी खराटे यांची निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी



आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी हकीम आर. चौधरी यांची तर सचिवपदी विजयजी खराटे सर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे संघटनेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी तसेच सामाजिक न्याय आणि समतेच्या दृष्टीने कार्य करण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हकीम आर. चौधरी यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या माध्यमातून वंचित, पीडित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. तर सचिव म्हणून निवड झालेल्या विजयजी खराटे यांनी संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीत विविध क्षेत्रातील अनुभवी व कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून संघटनेच्या विस्तारावर विशेष भर देण्यात येणार आहे. आगामी काळात मानवाधिकार जनजागृती, कायदेशीर मदत, तसेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा कार्यक्रम आखण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली.
या निवडीबद्दल विविध स्तरांतून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button