“वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिव्हल ‘सोनियाची सकाळ’ हिंगणा कवठळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी”…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- १४ एप्रिल २०२६
ग्रामपंचायत, सुजाता महिला मंडळ व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
हिंगणा कवठळ ता. संग्रामपूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य,बोधिसत्व,महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल “वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिव्हल” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सोनियाची सकाळ’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला हिंगणा ग्रामपंचायतीचे सरपंच मा. खंडेराव साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक विलास मोरखडे, एकनाथ मोरखडे, प्रवीण बावस्कार, संदीप मोरखडे, योगेश थोरात, सुरेश उमाळे, दिनेश उमाळे, मोहन उमाळे, अनिल उमाळे, दिनेश चोपडे, जिगर उमाळे, प्रणव गव्हांदे, यश वानखडे, सम्यक उमाळे यांच्यासह सुजाता महिला मंडळ, हिंगणा कवठळ यांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.कार्यक्रमादरम्यान भीमगीत, घोषवाक्ये आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शन यामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी एकत्र येत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडविले.या भव्य आणि उत्साहपूर्ण आयोजनामुळे हिंगणा कवठळ गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले तसेच नमो बुद्धाय मित्र मंडळ हिंगणा कवठळ यांच्याकडून सर्वांना भीम जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा…..!



