जिगाव प्रकल्प विभागाचा मनमानी कारभार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव तालुक्यातील झाडेगाव शिवारात जिगाव प्रकल्प अधिकाऱ्यांचा मनमानी वारभार सुरू असल्याची तक्रार शेतकरीवर्गाकडून केली जात असून परिणामी दोन एकर शेतातील पपईची फळबाग बरबाद झाल्याची तक्रार विजय गजानन माळी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याने जिगाव धरण व पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत असे नमूद आहे की, जिगाव प्रकल्पाअंतर्गत ग्राम झाहेगाव शेत शिवारातील शेतक-यांच्या शेतात कोणतीही पुर्वसुचना न देता किंवा
पूर्वसंमती घेता पाणीपुरवठ्याची पाईपलाईन एकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. गेल्या २७ मार्च रोजी तक्रारदार विजय माळी यांच्या गट नंबर ४० मधील शेतात या प्रकल्पांतर्गत चुकीचे खोदकाम झाल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. ज्यामूळे त्यांच्या ०.८० आर क्षेत्रफळावरील एकूण ३६३० पपई पिकाच्या झाडांचे नुकसान झाले, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत प्रकल्पाच्या अधिका-यांकडे तक्रार करुनही अद्याप त्यांच्या शेतातील
पुर्वसुचनेशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात खोदकाम
दोन एकर पपईची फळबाग बरबाद झाल्याची शेतकऱ्याची तक्रार
पाईपलाईन जोडण्यात आलेली नाही किंवा नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. तरी जिगाव प्रकल्प विभागाकडून बत्याद झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी विजय माळी यांनी केली आहे.
तुम्ही ब्लॅक मेलसारखे विषय करू नका. तुम्हाला नुकसान भरपाई फक्त जितकी मीटर पाईप लाईन तुमच्या शेतातून गेली त्याचीच मिळणार आहे. ३६६० झाडांचे व्हॅल्युएशन निघणार नाही. तसेच पाईप लाईन दुरुस्त करून दिली जाईल. पुन्हा पपई लागवड करा व पिकास पाणी द्या. असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर चौधरी यांनी वार्तालाप करताना केल्याचे विजय माळी यांचे म्हणणे आहे



