बुलढाणामहाराष्ट्र

भीम जयंती निमित्त बुलढाणा मध्ये जल्लोष मय वातावरण.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

 प्रतिनिधी - प्रशांत चव्हाण

बुलढाणा- बुलढाणा येथे परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त बुलढाण्यात जिजामाता प्रेक्षागार येथे बुद्ध – भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला,
या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार श्री. संजूभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे यांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण प्रेक्षागार भारावून गेले. बुद्ध -भीम गीतांच्या माध्यमातून. समता ,बंधुता , आणि न्यायाचा संदेश घरोघरी पोहोचला. यावेळी नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड, व गटनेते मृत्युंजय गायकवाड, यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, माता-भगिनी आणि युवक -युवतींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button