‘कारची पादचारी महिलेला धडक; आरोपी फरार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव शहरातील वान प्रकल्प
परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास
पोलीस स्टेशन
घडलेल्या एका थरारक अपघाताने संपूर्ण शेगाव हादरले आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने पादचारी महिलेला अक्षरशः उडवून दिल्याने ती गंभीर जखमी झाली असून, या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा थरारक क्षण दि. 06 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास श्रद्धा मुनालाल गुप्ता (वय 25) या आपल्या आई नीलम गुप्ता यांच्यासोबत शेगाव रोडने चौपाटीकडे पायी चालत होत्या, शांत रात्रीच्या वातावरणात अचानक खामगाव रोडकडून आलेल्या भरधाव कारने नीलम गुप्ता यांना जोरदार धडक दिली.
घड़क इतकी भीषण की…. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की नीलम गुप्ता या तब्बल 7 ते ४ फूट अंतराबर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला, मानेवर आणि डाव्या हाताला गंभीर दुखापती
झाल्या असून, त्या सध्या उपचाराधीन आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “क्षणात काय घडलं ते कळलंच नाही!” घडक देऊन बालक पसार अपघातानंतर वाहनचालकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळावरून पळ काढला. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की फिर्यादीला वाहनाचा क्रमांकही दिसू शकला नाही. या वेजबाबदार कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
गुन्हा पोलिसांची दाखल घडक मोहीम या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अप क्र. 208/2026 अन्वसे कलम 281, 125(a) BNS तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी पोहेका वासुदेव वानखडे यांनी प्राथमिक कारवाई पूर्ण केली असून, पुढील तपास पोहेका संजय करुटले (ब.न. 1275) यांच्याकडे दाखल
महाराष्ट्र पोलीस
सोपविण्यात आला पोलिसांची मोहीम फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. आहे. आरोपीच्या शोधासाठी सुरू नागरिक
स्पीडबर लगाम घाला।’ या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी
तीव्र संताप व्यक्त केला असून, रात्रीच्या वेळी वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करावी पोलिसांची गस्ना वाढवावी स्पीड ब्रेकर आणि सिग्नल यंत्रणा मजबूत करावी अशा मागण्या पुढे आल्या आहेत.
अपघातांची मालिका धावणार शेगावमध्ये कधी? दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांच्या घटनांनी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. निष्काळजी वाहनचालकावर कठोर कारवाई होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. समारोप एका निष्पाप पादचारी महिलेला भरधाव गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केल्यासारखी ही घटना केवळ अपघात नाही, तर बेफिकीर वाहनमालकांच्या मानसिकतेचे ज्वलंत उदाहरण आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का? आरोपी विरुद्ध कठोर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण शेगावचे लक्ष लागले आहे.



