बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरातून नागरिकांचे समाधान…


जी. डी. रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
10 एप्रिल मौजे जयपुर लांडे तालुका खामगाव येथे पूर्वनियोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय खामगांव यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध विभागाच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. महसूल विभागाकडील जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत
7/12, 8-अ, जातींचे दाखले, उत्पन्न दाखले, नवीन शिधा पत्रिका वाटप, संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनांचे लाभ मंजुरी वाटप आदेश, कृषी विभागाकडून पूर्व संमती मंजुरी आदेश, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमी वितरित करण्यात आले तसेच आरोग्य विभागाकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, रक्ताची तपासणी केली. ग्रा. प. कडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र वाटप केले. आधार दुरुस्ती, सेतू मार्फत मोक्यावर सुविधा पुरविण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांपैकी महसूल नायब तहसीलदार श्री. निखिल पाटील, संजय गांधी नायब तहसीलदार श्री. शिरीष वसावे यांनी शासकडील विविध योजनांबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले. या दरम्यान गावातील उपस्थित नागरिकांनी त्यांच्या गावात प्रथमच होतं असलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयपूर लांडे येथील सरपंच सौ. भारतीताई गोपाल लांडे, प्रमुख अतिथी म्हणून निवडणूक नायब तहसीलदार श्री. जोशी साहेब, नायब तहसीलदार श्री. निखिल पाटील, नायब तहसीलदार श्री. शिरीष वसावे तसेच वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र रोहणा, तसेच मंडळ अधिकारी, श्री. नागे, श्री. पल्हाडे, श्री. पद्मने, श्री. चौधरी तसेच तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, मुख्यध्यापक श्री. राजेश सावळे महसूल सेवक तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जयपूर लांडे गावातील नागरिक, महिला, पुरुष व विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हजारें ग्रा. म. अधिकारी यांनी केले तर सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी श्री. ठोसरे व आभार श्री. आर एम नागे मंडळ अधिकारी जनुना यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button