जळगावा जिल्हाबुलढाणा

आदर्श शिक्षक पुरस्काराने वसंत खंडारे सर सन्मानित सन २०२६..!!!

स्टार भारत लाईव्ह,

प्रतिनिधी संग्रामपूर, रतन भगत.

संग्रामपूर, दि.४/४/२०२६ महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2025 26 यावर्षी संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील पाचोरा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्य असलेले वसंत सदाशिव खंडारे सर यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा राज्यस्तरावर सन्मान झाल्याने सर्वत्र अभिनंदन याचा वर्षा होत आहे. पुणे येथील निगडी परिसरातील ग दि माडगूळकर नाट्यगृहात एज्युकेशन आयकॉन्स समिट 2026 या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी उत्साह पूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते सन्माननीय दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते वसंत खंडारे सर यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून निवडक शिक्षकांची काटेकोर प्रक्रियानंतर निवड करण्यात आली होती. या प्रक्रियेत शिक्षक खंडारे सर यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्य ,विद्यार्थ्यांपर्यंत असलेली निष्ठा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मानाचे स्थान पटकावले आहे. वसंत खंडारे सर हे उपक्रमशील शिक्षक म्हणून सर्वत्र ओळखले जातात तसेच विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यपुस्तकांपुरते ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेचा ,सर्जनशीलतेचा, आत्मविश्वासाचा विकास करण्यावर त्यांनी विशेष असा भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांचा नैतिक, सामाजिक आणि भावनिक विकास होण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे…✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button