चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर अविरोध….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली: प्रतिनिधी
आरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर समाधान सुपेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीपूर्वी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा रंगली होती.
मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि संचालकांनी एकमताने समाधान सुपेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने शनिवार १३ जून रोजी निवडणूक बिनविरोध झाली.
काँग्रेसचे माजी आमदार लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे, राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे,माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर, शिवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता काबीज केलेली असल्याने सभापती महाविकास आघाडीचाच होणार हे निश्चित होते. विद्यमान सभापती डॉ. संतोष वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सभापतीपदासाठी अनेक नावे इच्छुक होती. दरम्यान, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांनी बाजार समितीच्या संचालकांशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली होती. अखेर सर्व राजकीय घडामोडींना पूर्णविराम देत समाधान सुपेकर यांच्या नावावर एकमत झाले.
प्राधिकृत अधिकारी राजेंद्र घोंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अन्य कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरल्याने समाधान सुपेकर यांची सभापतीपदी अविरोध निवड घोषित करण्यात आली. या अगोदर समाधान सुपेकर यांनी तीन टर्म जिल्हा परिषद सदस्य, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार राजेष एकडे, मा.प्रा.नरेंद्र खेडेकर, मा.नरेषजी शेळके, एकनाथराव थुट्टे, पि.एस.✍️



