जळगावा जिल्हाबुलढाणा

आई रेणुका मातेच्या वहन मिरवणुकीवर महायुतीतर्फे पुष्पवृष्टी..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली,,,,, प्रतिनिधी
आरुना दत्तात्रय खंडागळे

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणी आ. श्वेता महाले यांची प्रमुख उपस्थिती

आई रेणुका मातेच्या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त चिखली नगरी आज भक्तीभावाने न्हाऊन निघाली. चिखली शहरातून मार्गस्थ झालेल्या वहन मिरवणुकीचे खामगाव चौफुली येथे चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात चिखली शहर महायुतीच्या वतीने पुष्पवृष्टी करून भाविकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अधिकच भव्य ठरला.

पुष्पवृष्टीच्या त्या पवित्र क्षणी वातावरणात श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांचा अपूर्व संगम अनुभवायला मिळाला. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आई रेणुका मातेच्या कृपेची झलक स्पष्टपणे दिसत होती.

आमदार सौं.श्वेता महाले पाटील यांनी आई रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.

यावेळी विद्याधर महाले (मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव), नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, शहर प्रमुख विलास घोलप, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, कपिल खेडेकर, राहुल सवडतकर, भास्कर राऊत, बळीराम काळे, मायाताई म्हस्के (जिल्हा प्रमुख, शिवसेना महिला आघाडी), कैलास भालेकर, श्रीकांत टेहरे, राजेश पवार, अमोल ढोरे पाटील यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.✍🏻

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button