बुलढाणामहाराष्ट्र

खामगाव वसाळी बस पुर्वरत सुरु करा टुनकी ग्रा पं सरपंच प्रशासक सिमाताई वानखडे यांची आगार प्रमुख यांना निवेदन

खामगाव वसाळी बस पुर्वरत सुरु करा टुनकी ग्रा पं सरपंच प्रशासक सिमाताई वानखडे यांची आगार प्रमुख यांना निवेदन

प्रतिनिधी.राजेंद्र मुंडे

खामगाव ते वसाळी एस टी बस टुनकी वसाळी रसत्याचे काम सुरु असल्याने खामगाव आगार व्यवस्थापक यांनी बस सेवा बंद केली होती खामगाव वसाळी बस पुर्वरत सुरू करावी अशी मांगणी टुनकी ग्रा पं प्रशासक, सरपंच सिमाताई राजेन्द्र वानखडे यांनी एका निवेदनाव्दारे खामगाव एस टी आगार व्यवस्थापक यांचे कडे केली आहे

आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि खामगाव आगाराची खामगाव वसाळी शेगाव वरवट मार्गे टुनकी परिसरातील प्रवाशी वर्ग नागरिकांसाठी सोईयुक्त जुने शेडूल असल्याने टुनकी वसाळी दरम्यान रसत्याचे व पुल रपट्याचे काम सुरू होते त्यामुळे आगार व्यवस्थापक यांनी सदर एस टी बस सेवा बंद केल्याने या परिसरातील प्रवाशी नागरिकांची गैरसोय होत आहे आजरोजी टुनकी वसाळी दरम्यान रस्ता पुल बांधकाम पुर्ण झालेले असल्याने सदर रस्ता रहदारी योग्य झाला आहे वसाळी टुनकी परिसरातील प्रवाशी नागरिकांना शेगाव खामगाव कडे जाण्यासाठी सकाळी कोणतीच सुविधा नसल्याने नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही त्यात या मार्गावर प्रवाशी वर्गाची वर्दळ पाहता खामगाव वसाळी जुने शेडूल खामगाव आगार व्यवस्थापक यांनी या परिसरातील प्रवाशी वर्गासाठी एस टी बस पुर्वरत सुरु करावी अशी मांगणी टुनकी ग्रा पं प्रशासक सरपंच सिमाताई राजेन्द्र वानखडे यांनी संबंधीत खामगाव एस टी आगार व्यवस्थापक यांच्या केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button