खामगाव मधील शिवांगी बेकर्स चा प्लॉट बंद पाचशे कामगारांवर उपासमारीचे संकट, चहाचा साथीदार पार्ले थांबला!!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
दि. १७/३/२०२६ (खामगाव):-सर्वसामान्यांच्या चहाच्या कपासोबत जुळलेले बिस्किट म्हणजे पार्लेजी पण याच लोकप्रिय बिस्किटाच्या उत्पादनाला आता बुलढाणा जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. गॅसच्या तीव्रच टंचाईमुळे खामगाव येथील शिवांगी बेकर्स या कारखान्यातील उत्पादन गेल्या 11 मार्चपासून पूर्णपणे ठप्प झाले असून तब्बल पाचशे कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणामांचा फटका आता थेट स्थानिक उद्योगांना बसू लागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. खामगाव येथील शिवांगी बेकर्स ही कंपनी देशभरात प्रसिद्ध असलेल्या पार्ले जी बिस्किटांचे उत्पादन करते. मात्र व्यवस्थित याच्या पुरवठ्यावर आलेल्या मर्यामुळे कंपनीला आवश्यक असलेला जास्त मिळत नसल्याने उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे थांबवावी लागत आहे. या कारखान्यात दररोज सुमारे ८० टन बिस्किटाचे उत्पादन केले जात होते. त्यामध्ये जवळपास 60 टन ग्लुकोज बिस्किटे तर विस्टन क्रीम बिस्किटे तयार केली जात होती. मात्र बिस्किट तयार करण्यासाठी लागणारे ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालत असल्यामुळे गॅस पुरवठा खंडित होतास संपूर्ण उत्पादन हे पूर्णतः बंद पडले आहे.
कंपनीचे संचालक अभय अग्रवाल यांनी सांगितले की आमचा प्लांट 11 मार्चपासून बंद आहे. कारखान्यासाठी दररोज सुमारे ३ टन गॅस ची आवश्यकता असते. मात्र गॅस मिळत नसल्यामुळे दोन्ही उत्पादन लाईन थांबले आहेत. आमच्याकडे सुमारे पाचशे कामगार काम करतात. त्यामुळे उत्पादन लवकर सुरू झाले नाही तर या कामगारांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळण्याची भीती आहे. दरम्यान बिस्कीट उत्पादन हे अत्यंत आवश्यक सेवेची संबंधित उद्योग असल्याने प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पार्ले बिस्कीट कंपनीकडून आणि त्यांच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. अन्यथा खामगावातील या महत्त्वाच्या उद्योगावर गंभीर परिणाम होऊन शेकडो कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. तरी प्रशासनाने या बाबीकडे विशेष असे लक्ष द्यावे अशी संबंधित वारले कंपनीच्या व्यवस्थापकाकडून मागणी केल्या जात आहे….



