बुलढाणा

जागतिक महिला दिनानिमित्त खामगाव येथे मोफत महिला आरोग्य शिबिर….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

खामगाव : जागतिक महिला दिनानिमित्त पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खामगाव यांच्या वतीने महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य मार्गदर्शन व होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दि. ४, ५, ६ व ७ मार्च २०२६ दरम्यान सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत पंचशील होमिओपॅथिक रुग्णालय, बालाजी प्लॉट, खामगाव येथे होणार आहे.
शिबिरामध्ये महिलांचे रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, योगोपचार, फिजिओथेरपी उपचार तसेच आहार विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच संधिवात, दमा, अ‍ॅलर्जी, त्वचारोग, केसांचे विकार, मासिक पाळीतील तक्रारी, पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी आदी आजारांवर मोफत होमिओपॅथिक औषधोपचार दिले जाणार आहेत.
नोंदणी केलेल्या रुग्णांना पुढील ३ महिने मोफत होमिओपॅथिक औषधोपचार देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.आवश्यकतेनुसार काही रुग्णांना महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभाग (OPD) व आंतररुग्ण विभाग (IPD) मध्ये पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे नोंदणी केलेल्या रुग्णांना पुढील ३ महिने मोफत होमिओपॅथिक औषधोपचार दिले जाणार आहेत.
या उपक्रमाचे मार्गदर्शन व आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिनव वि. कविश्वर यांच्या नेतृत्वाखाली होत असून प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. शिल्पा अ. कविश्वर या विशेष सहकार्य करत आहेत.
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button