खानदेशजळगावा जिल्हावारकरी संप्रदाय

मुक्ताईनगर संस्थानतर्फे ‘फिरता नारळी सप्ताह’ निमित्त भव्य ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

रावेर (प्रतिनिधी) – सकल हिंदू समाज यावल व रावेर तालुक्याच्या वतीने श्री आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताईनगर संस्थान आयोजित “फिरता नारळी सप्ताह” निमित्त भव्य ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दिनांक ०६ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता लोहरा चौफुली, श्री क्षेत्र कुंभारखेडा, ता. रावेर, जि. जळगाव येथे संपन्न होणार आहे.

या पवित्र कार्यक्रमास प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज (राष्ट्रीय कोषाध्यक्ष, अखिल भारतीय संत समिती) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण होणार असून श्री गुरु ह.भ.प. रविंद्र महाराज हरने (मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख) यांचे हस्ते होणार आहे.

या प्रसंगी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष मा. भैय्या साहेब रविंद्र पाटील यांच्यासह वंदनीय संत, महंत, शास्त्रीजी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार तसेच सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज यावल व रावेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button