
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की येत्या सोमवार दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पोस्ट ऑफिस विभागाच्या विविध तक्रारी सोडवण्यासाठी बुलढाणा डाकघर विभागातर्फे सकाळी ठीक अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आलेली आहे पोस्टाच्या कार्यान विषयी किंवा कामकाजाबद्दल ६ आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशातक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.
देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक असा भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केलेले आहे .पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारचे सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते .ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार ,किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी निर्माण होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालत घेण्यात येते विशेषता टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर बाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा लागेल. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकाऱ्यासह मूळ तक्रार पाठवली आहे ,त्या अधिकाऱ्याचे नाव आणि हुद्दा आधी संबंधित माहिती डाग सेवेबाबत तक्रार डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे बुलढाणा विभाग बुलढाणा यांचे नावे दोन प्रतीत शुक्रवार दिनांक ६मार्च २०२६पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.



