महाराष्ट्रविदर्भ

आई-वडिलांचे छत्र हरविलेली प्रज्ञा झाली..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा. प्रज्ञा वाकोडे हिची मुंबई पोलीस शिपाई पदाकरिता निवड झाली नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये हे स्पष्ट झाले आहे प्रज्ञा ही तेल्हारा तालुक्यातील शेरी या गावात तिचे मामा प्रभाकर दशरथ पोहरकार व मामी यांच्या घरी राहायची मामा-मामींनी त्यांना आई-वडिलांची कमी भासू दिली नाही प्रज्ञाची आई तिच्या वयाच्या अवघ्या चौथ्यावर्षी तसेच वडील वयाच्या बाराव्या वर्षी मरण पावले त्यामुळे प्रज्ञाच्या डोक्यावरचे छत्र हरविणे ती पोरखी झाली प्रज्ञाला दोन भावंड आहेत ती तिच्या दोन्ही भावंडासह तेल्हारा तालुक्यातील शेरी या गावात वास्तव्यास आली तेथे प्रज्ञा चे मामा मामी यांनी तिचे पोषण केले मामा-मामीने त्यांना पोटच्या लेकराप्रमाणे माया लावली तसेच तिला शिक्षणासाठी मार्गदर्शन केले प्रोत्साहित केले व तिथेच तिचे शिक्षण पूर्ण केले पण प्रज्ञाने स्वप्न उराशी बाळगत ती या घराबाहेर पडली तेल्हारा येथील खाजगी शिकवणीवर स्पर्धा परीक्षाचे शिक्षण घेण्यासाठी तिने प्रवेश घेतला मात्र तिला हे झेपत नव्हते मामा प्रभाकर पोहरकर व तिचा भाऊ नितीन वाकोडे यांनी तिला आशेची किरण दाखवत प्रोत्साहित केले तिला स्पर्धा परीक्षेसाठी परिपूर्ण करण्याकरिता मार्गदर्शन केले प्रज्ञाच्या भावाने लहान वयातच प्रज्ञाची जबाबदारी तिच्या शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतली शारीरिक सरावासाठी प्रज्ञाने अकोला येथे जाऊन प्रशिक्षण घेण्याचे ठरविले मात्र फी जास्त असल्यामुळे ती स्वतंत्र तिच्या मैत्रिणी समवेत अकोला येथेच राहून आत्मनिर्भर होत तयारी सुरू केली व जिद्दीने सराव पूर्ण केला पोलीस भरतीची तारीख जवळच आलेली होती व प्रज्ञाने मोठ्या उत्साहाने मैदानी परीक्षा 41 मार्काने तसेच पुढील लेखी परीक्षा वैद्यकीय परीक्षा या सर्वच चाचण्यांमध्ये तिने घवघवीत यश मिळवले तिने जास्तीत जास्त वेळ सराव आणि अभ्यासाला दिला तसेच जिद्दीने चिकाटीने अहोरात्र परिश्रम घेतल्याने तिला हे यश मिळाले या यशाचे श्रेय ती मामा-मामी बहिण भाऊ तसेच राजे संभाजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.सुधीर ताकोते सर तसेच मित्र परिवाराला देते✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button