Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रसंपादकीय

गाडगे बाबा यांची शतकोत्तर सुवर्णजयंती

  गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी  शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झला . हे वर्ष त्यांच्या जन्माचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष आहे . अगदी निरक्षर असलेले गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून अगदी उच्याविद्याविभुशित लोकांनाही लाजवतील असे विचार मांडत असत . समाजात असलेल्या अनिष्ट चालीरीती , रूढी परंपरा , अंधश्रद्धा , उपास , तापास , नवस , पशुबळी , अस्पृश्यता , देव , धर्मभोळेपणा यावर ते प्रखर हमले करत . समाजप्रबोधनासाठी त्यांनी कीर्तन हे माध्यम निवडले होते . अत्यंत सोप्या भाषेत प्रश्नोत्तरे स्वरूपात ते प्रबोधन करीत असत . ते त्यांच्या आयुष्यात कधीच देवळात गेले नाही .
 अगदी निरक्षर असणाऱ्या गाडगे बाबांना उच्यपदस्थ अधिकारी कीर्तनाला बोलावत होते . गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये सुद्धा लोक त्यांना निमंत्रित करत होते . त्यांची राहणी अगदी साधी होती . अंगावर फाटकी गोधडी व  हातात गाडगे आणि काठी राहत असे . यामुळे ते गाडगे बाबा , गोधडे महाराज म्हणून परिचित झाले . त्यांचे नाव डेबूजी होते मात्र या नावाने ते ओळखले जात नसत . त्यांचे वडील झिंगरा जाणोरकर तसे श्रीमंत होते मात्र त्यांचे अकाली निधन झाले व डेबूजी त्यांच्या आई सोबत मामांकडं राहायला आले .पुढं त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही .
 १९०५ पासून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले . ते नेहमी १) चोरी करू नका , २) सावकाराकडून कर्ज काढू नका , ३) व्यसनाच्या आहारी जाऊ नका , ४) देवाधर्माच्या नावाखाली पशुहत्या करू नका , ५) जातीभेद , अस्पृश्यता पाळू नका असा उपदेश करत असत . गावांमध्ये अनेक दगडांना शेंदूर फासून लोक पूजा करत असत या गोष्टीला त्यांनी कडाडून विरोध केला , पण लोक ही बाब सोडायला तयार होत नसत तेंव्हा त्यांनी काही गावांतील शेंदूर फासलेले दगडं नदीत फेकून दिले . 

गाडगे बाबा तसे अंधश्रद्धा निर्मूलन करणारेच होते . त्यांनी मुलांना शिक्षणाचा उपदेश दिला . त्यांनी काही शाळा , धर्मशाळा , वसतिगृह चालविले . त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत घनिष्ट संबंध होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने अमरावती येथील विद्यापीठास गाडगे बाबांचे नाव दिले .
गाडगे बाबा तसे संत म्हणून सुद्धा परिचित आहेत . त्यांचे कार्य खूप मोठे आहे आज त्यांची १५० वी जयंती आहे . १५० व्या जयंती निम्मित खरेतर शासकीय , सामाजिक पातळीवर मोठयाप्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे होते. मात्र सर्वत्र उदासीनता दिसून येते . त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात सुद्धा विशेष कार्यक्रमांचे आयोजन दिसत नाही . खरेतर किमान विद्यापीठाने गाडगे बाबांच्या जीवन कार्यावरील एका संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन करणे गरजेचे होते . शासनाने त्यांच्या संबंधाने काही नवीन योजना जाहीर करणे आवश्यक होते .
त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेले प्रश्न , समाजास सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वच्छतेचे महत्व , शिक्षणाचे महत्व देशाला नेहमीच नवी ऊर्जा देत राहील .
गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन .
जयसिंग वाघ

y

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button