खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

*अखेर बनावट सह्याद्वारे ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा डाव उधळला:बेलासवाडी येथील महिलांचे बिडीओना निवेदन!*

मुक्ताईनगर प्रतिनिधी

दि 16|02/2026

*मुक्ताईनगर तालुक्यातील बेलासवाडी येथील सुरळीत चाललेल्या ग्रामपंचायत कारभाराविषयी हेतूपुरस्कर गावातील काही महिला ग्रामस्थाच्या बनावट सह्यांची तक्रार करून सरपंच व इतर सदस्यांना बदनाम करण्याचा डाव आज अखेर उघडकीस आला.ऑक्टोबर 2025 मध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे बेलासवाडी येथील वंदना कोळी व अर्जात सह्या करणार या नावे पंचायत समिती येथे दाखल करण्यात आला होता. अर्जात ग्रामपंचायतीच्या कथित भोगळ कारभाराविषयी व पदाधिकारी यांचेवर कारवाई विषयी नमूद करण्यात आले होते. दरम्यान या तक्रार अर्जाची दखल घेत त्या अनुषंगाने संबंधीत अधिकारी यांनी जानेवारी 2026 मध्ये ग्रामपंचायत मधील संबंधित कथित दोषीवर दोषारोप संदर्भात पत्र काढले होते.मात्र आज मुक्ताईनगर पंचायत समिती येथे वेगळेच घडले. ज्या सह्यांद्वारे तक्रार करण्यात आली होती त्या अर्जावरील तक्रारदारांच्या सह्या ह्या बनावट असल्याचे सिद्ध झाले. अर्जावर असलेल्या सह्या ह्या आमच्या नव्हेच, कुणीतरी आमच्या बनावट सह्या केलेल्या असून आम्ही कोणतीच तक्रार कधी केली नसल्याचे महिलांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधित ग्रामपंचायत बद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. आपणाकडे आलेला पूर्वीचा अर्ज निकाली काढण्यात यावा तसेच शासनाची दिशाभूल करण्याऱ्या दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वजा विनंती संबंधित महिलांनी केली आहे.आज पंचायत समिती येथे प्रत्यक्ष हजर होऊन गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असंख्य महिलांच्या सह्या होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button