खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

सुकळीत सरपंच व ग्रामसेवकावर अपहाराचा आरोप;मनमानी कारभाराची चौकशी करण्याची उपसरपंच यांची मागणी

सुकळीत सरपंच व ग्रामसेवकावर अपहाराचा आरोप;मनमानी कारभाराची चौकशी करण्याची उपसरपंच यांची मागणी


मुक्ताईनगर प्रतिनिधी

दि 16|02/2026
सुकळी येथील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत ग्रामसेवक या दोघांनी संगनमत करीत ग्रामनिधी व 15 व्या वित्त आयोगातील निधीत अपहार केल्याचा आरोप उपसरपंच नितीन पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांचेकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप ग्रामपंचायत सुकळी येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमाताने ग्रामनिधी, पाणीपट्टी, 15 वा वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार करून पैशांची अफरातफरी केली आहे.
सदरचा भ्रष्टाचार उघडं करण्यासाठी उपसरपंच नितीन पाटील हे 8 दिवसापासून मासिक सभा घेणेबाबत विनवणी करीत आहे मात्र सरपंच व ग्रामसेवक हे उडवाउडवी ची उत्तरे देऊन फोन बंद करून गावाबाहेर फरार होतात. तसेच भ्रष्टाचार लपविण्यासाठी उडवा उडावीची उत्तरे देतात.
उपसरपंच व इतर सदस्य यांना विश्वासात न घेता, मासिक मिटिंग न घेता मनमानी पद्धतीने वैक्तिक रित्या व संगनमताने मोठ्या प्रमाणात अपहार केला असून, सदर प्रकरणाची 8 दिवसात सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आलेला आहे.
मात्र ग्रामपंचायत अधिकारी राठोड यांनी कोणताही भ्रष्टाचार झालेला नसल्याचे प्रतिनिधिशी बोलतांना सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button