बुलढाणा

रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका! संग्रामपूर तालुक्यातील 24 गावात फार मोठ्या प्रमाणात नुकसान!

स्टार भारत लाइव एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

    सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुका हा तसा मागासलेला तालुका म्हणून गणल्या गेला आहे .परंतु तसे नसून हा तालुका शेतीच्या दृष्टिकोनातून आता प्रगती करीत आहे. कारण या तालुक्याला शासनातर्फे वेळोवेळी मिळालेली सर्व स्तरातून योग्य ती मदत आणि योग्य असे मार्गदर्शन. दरवर्षीप्रमाणे संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी सुद्धा आपल्या शेतामध्ये रब्बी पिकांची फार मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. परंतु सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.  या नुकसानीची तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. संग्रामपूर तालुक्यात २४ जानेवारी रोजी अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यांमुळे शेतातील रब्बी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .यामध्ये प्रामुख्याने गहू हरभरा मका संत्रा तसेच इतर पिकांचा समावेश आहे. महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील २४ बाधित गावांमधील एकूण १५८६.७हेक्टर क्षेत्रातील पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान ग्रस्त बाधित गावांमध्ये वसाडी हडीयामल ,सावळा मारोड सायखेड अकोली बुद्रुक, अकोली खुर्द ,रायपुर, मालाठाणा बुद्रुक ,मालठाणा खुर्द ,गोपाळखेड, पळशी, झाशी निमखेड ,करमोडा ,शिवनी लोहगाव बुद्रुक, लोहगाव खुर्द लाडनापुर ,आणि चिचारी असे २४ गावातील एकूण १५८६.७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह महसूल व कृषी विभागाने शेतशिवारात जाऊन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. रब्बी हंगामातील पिकांसह हरभरा ,गहू, संत्रा व इतर फळबागाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी हा अत्यंत अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे. 

(महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणे केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येत आहे.)
प्रशांत पाटील.
तहसीलदार संग्रामपूर.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button