फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार; २ आरोपींना अटक !

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार; २ आरोपींना अटक !
पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.मे २०२५ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत पवन संजय परदेशी आणि प्रथमेश पाटील या दोघांनी पीडितेचे लैंगिक शोषण केले. याशिवाय विकी शिवाजी राजपूत नावाच्या तिसऱ्या आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला. पीडितेने हिंमत दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुलकुमार निहाळ यांनी तातडीने अटकेचे आदेश दिले. सध्या दोन आरोपी पोलीस कोठडीत असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे.



