बुलढाणा

कर सवलतीचा लाभ घ्या असे आव्हान : गटविकास अधिकारी मुकेश मोहोर

कर सवलतीचा लाभ घ्या असे आव्हान : गटविकास अधिकारी मुकेश मोहोर .स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी.

गजानन खिल्लारे.देऊळगाव

राजा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव मही येथे १०० टक्के कर भरणाऱ्या मालमत्ता तारकांचा सत्कार. कराच्या माध्यमातून गावाचा विकास शक्य :मोहोर. ग्रामपंचायतचा विकास हा नागरिकांच्या सहभागावर अवलंबून असतो. वेळेवर व पूर्ण कर भरणाऱ्या मालमत्ता धारकामुळे गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करता येतात. देऊळगाव मही येथे १०० टक्के कर भरणाऱ्या नागरिकांचा आज सन्मान करताना अभिमान वाटतो. सध्या शासनाने कर सवलती मध्ये ५० टक्के सूट दिली असून, जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आव्हान गटविकास अधिकारी मुकेश मोहोर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कर भरण्यात आलेल्या नागरिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी मुकेश मोहोर म्हणाले की, ग्रामपंचायत चा विकास हा कराच्या माध्यमातूनच शक्य आहे, वेळेवर व पूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांमुळेच गावात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती, यासारख्या मूलभूत सुविधा सक्षमपणे राबवता येतात. त्यामुळे इतर नागरिकांनी ही पुढे येऊन कर भरावा. सध्या लागू असलेल्या कर सवलत योजनेमार्फत ५० टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आव्हानही त्यांनी केले. कार्यक्रमास सरपंच वसुदेव पाटील शिंगणे, अभियंता अमोल इंगळे, गणेश शिंगणे, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित रंगनाथ शिंगणे, मिलन शेळके, प्रभाकर झिने, दाऊद भाई, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कर भरणाऱ्या नागरिकांचे कौतुक करत इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले. या सत्कारामुळे ग्रामस्थांमध्ये कर भरण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायतच्या उत्पन्नात वाढ होऊन गावाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button