मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या गटनेतेपदी नगराध्यक्षा संजना पाटील बिनविरोध

मुक्ताईनगर । प्रतिनिधी ।
मुक्ताईनगर शहराच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, मुक्ताईनगर नगरपंचायतच्या गटनेते व प्रतोद पदाची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्षा संजना चंद्रकांत पाटील यांची गटनेते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात + आली. नगरपंचायत निवडणुकीनंतर गटनेते कोण होणार, याकडे संपर्ण
तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर नवनिर्वाचित नगराध्यक्षा संजना पाटील यांची सर्व सदस्यांच्या एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे सत्ताधारी गटाची पकड अधिक मजबूत झाली असून, विकास कामांना आता अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निवड प्रक्रियेवेळी शिवसेनेचे व सहयोगी अपक्ष उमेदवारांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना विजयी उमेदवार प्रशांत अशोक टोंगे, खान नसिबाबी शाहबाज, प्रिती प्रमोद भालेराव, अंजनाबाई सुपडू सोनवणे, शेख ताहेराबी लकमान,
शे. मस्तान शे. इमाम, संतोष प्रल्हाद कोळी, प्रमोद हरी भारंबे, सविता सुभाष भलभले, देवयानी निलेश शिरसाट आणि सहयोगी अपक्ष उमेदवार नुसरत बी मेहबूब खान, हासम शहा कासम शहा, सलीमाबी मुशीर मण्यार उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी एकजुटीने संजना पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला.
गटनेतेपदी निवड जाहीर होताच संजना पाटील यांच्यावर मुक्ताईनगर शहरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.



