नवनिर्वाचित नगरसेवकांची आ. श्वेता महाले पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

स्टार भारत लाईव्ह ऐकसप्रेस
चिखली: प्रतिनिधी
आरुना दतात्रय खंडागळे
आ.श्वेता महाले पाटील यांच्या निवासस्थानी लोणार, बुलढाणा व देऊळगाव राजा येथील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी सदिच्छा भेट देत आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.
या भेटीदरम्यान लोणार नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवक श्री. शुभम देसाई, बुलढाणा नगरपरिषदेतील सोहम झाल्टे, तसेच देऊळगाव राजा नगरपरिषदेतील श्री. निशिकांत भावसार, श्री. प्रवीण धनावत व श्री. राजेश भुतडा यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
आ. श्वेता महाले पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देत सांगितले की, नगरपरिषद ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेली व्यवस्था असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाशयोजना, आरोग्य व मूलभूत सुविधा या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून काम करावे. विकासकामांमध्ये पारदर्शकता, वेळबद्धता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
तसेच, राज्य व केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा विश्वास जपणे, प्रशासनाशी सकारात्मक समन्वय ठेवणे आणि पक्षाच्या विकासाभिमुख ध्येयधोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे हेच यशाचे सूत्र आहे, असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले



