बुलढाणा

पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास तात्काळ कारवाई

पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास तात्काळ कारवाई:

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

गजानन खिल्लारे.

पतंग उडवणाऱ्या लहान मोठ्या हौश्यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्देशनाचे पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असे आदेश तहसीलदार वैशालीताई डोंगरजाळ यांनी एका प्रसिद्धी द्वारे काढले आहे. पतंग उडवणाऱ्या लहान-मोठ्या मावश्यांनी पतंग काढण्याच्या स्पर्धा सुरू केलेले आहे. मकर संक्रातीचे दिवस अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपले असताना तरुणाईने पतंग उडवणे सोबतच एकमेकांचा पतंग काटने या मकर संक्रांतीच्या दिवशी यशस्वी प्रयोग करण्यासाठी आत्तापासून मैदानात घराच्या गच्चीवर गल्लीत पतंग उडवणे पतंग काटने यासाठी प्रशिक्षण घेत आहे. पतंग उडवण्यासाठी कच्चा धागा (दोरा) वापरायला असायलाच हवा मात्र एरवी तसे दिसून येत नाही. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नायलॉन मांजा वापरून जीवघेणा खेळ खेळतात. या खेळात हातातून मांजा सुटल्यावर वाहन चालकाच्या गळ्यात अडकल्यास गळा कापून जीव जाण्याचा प्रकार हा वाढीस लागला आहे. पक्षी प्राणी यांचा सुद्धा याच्यामध्ये अडकून जीव जाण्यात शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाने नायलॉन मांजावर पूर्णता बंदी घातली आहे. जो कोणी दुकानदार नायलॉन मांजा विकताना आढळून आल्यास किंवा मांजा लावलेला पतंग चालक हा आढळून आल्यास त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ . किरण पाटील यांनी कठोरात कठोर कारवाई करण्याच्या लेखी सूचना तहसीलदार यांना दिले आहेत त्यामुळे याकडे गांभीर्याने घेणे गरजेचे असून देऊळगाव राजा तालुक्यात असा प्रकार दिसून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार वैशालीताई डोंगरजाळ यांनी कळविले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button