बुलढाणा

निवडणुकीत विजयी चौकार मारणाऱ्या सौ. सुलभाताई दुतोंडे.

निवडणुकीत विजयी चौकार मारणाऱ्या सौ. सुलभाताई दुतोंडे.
असं म्हणतात की राजकारण हे बेभरवशाचे क्षेत्र आहे. आणि हे खरे सुद्धा आहे. या क्षेत्रात बरेचजण असे दिसतात की, ज्यांच्याकडे सर्वकाही असूनही ते कधीच निवडणूक जिंकत नाहीत. तर काही जण असे त्यांच्याकडे काहीही नसतांना राजकारणातील त्यांचा चढता आलेख भल्या भल्यांना अचंबित करतो. अशातीलच एक राजकारणी व्यक्तिमत्व म्हणजे सौ. सुलभाताई रमेशजी दुतोंडे. त्यांची राजकीय कारकीर्द आश्चर्यचकित करणारीच आहे.एका अगदी सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या व सामान्य कुटुंबातच विवाह झालेल्या सौ. सुलभाताई आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर हिवरखेडच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्या आहेत. पराभव कशाला म्हणतात हे त्यांना माहीतच नाही. 2010 साली त्या हिवरखेड ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्यात. 2014मध्ये त्या पुन्हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंचपदी विराजमान झाल्यात. 2019 मध्ये त्या हिवरखेड सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्यात व हिवरखेड ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषदे मध्ये झाल्यानंतर त्या आता नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्या आहेत. एकप्रकारे विजयाचा चौकार मारत त्या आतापर्यंत अजेय, अपराजित ठरल्या आहेत. त्यांचे पती श्री रमेशभाऊ दुतोंडे हे सुद्धा हिवरखेडचे उपसरपंच, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत. हे पती-पत्नी आतापर्यंत एकूण नऊ निवडणुका जिंकले आहेत. एकीकडे कुणीही एकदा -दोनदा निवडणूक जिंकल्यास लोक त्या उमेदवाराला कंटाळतात, त्याचे विरोधक वाढतात ही सत्यस्थिती असतांना दुसरीकडे मात्र रमेशभाऊ दुतोंडे व सौ. सुलभाताई दुतोंडे यांची लोकप्रियता मात्र वाढतच असल्याचे दिसून येते.
याला कारण म्हणजे या जोडप्याने स्वतःला जनसेवेला वाहून घेतले आहे. चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणे, लोकांच्या लहानमोठ्या समस्या सोडवणे, गरीब -श्रीमंत भेद नं करणे, पक्षभेद विसरून सर्वांची कामे करणे, कुणाच्याही अडिअडचणीत धावून जाणे, कुणाच्याही धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करणे हे त्यांच्या राजकीय यशाचे गमक आहे. शिवाय राजकारणाच्या सारीपाटावरच्या अचूक गोट्या बसवण्याचे अद्भुत कौशल्य रमेशभाऊला अवगत आहे.
आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेशभाऊंनी आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपदादा धोत्रे, अनिलदादा गावंडे यांच्यासह संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर हिवरखेड नगर परिषदेच्या हिवरखेड येथील प्रचारसभेत बोलतांना पक्षनिष्ठा शिकावी ती रमेश दुतोंडे यांच्याकडून या शब्दात रमेशभाऊ दुतोंडे यांचा गौरव केला. राजकारणात सतत यश मिळवूनही रमेशभाऊ व सुलभाताईचे पाय जमिनीवरच आहेत. मी ची बाधा त्यांना शिवली नाही. साधे राहणे, साधे बोलणे, व दिलेला शब्द पाळणे हे रमेशभाऊ व सुलभाताईचे वैशिष्ट्य!सौ. सुलभाताई हिवरखेडच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत व नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी त्या आपला पदभार स्वीकारत आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!त्यांच्याहातून अशीच सेवा घडत राहो, हिवरखेड शहराचा विकास होवो, व त्यांची पुढील राजकीय कारकीर्द उत्तरोत्तर बहरत जावो हिच शुभेच्छा!
शब्दांकन -महेंद्र कराळे हिवरखेड.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button