गॅसच्या भडक्यात तीन जण भाजले
दोघांची प्रकृती गंभीर

मलकापूर प्रतिनिधी .
जालना : जुना जालन्यातील सिद्धिविनायक नगर भागात एका घरात पेटत्या गॅस जवळ असलेल्या एका महिलेच्या साडीने गॅसला चिकटून पेट घेतल्याने पहिलीसह शेजारी तिच्याशी गप्पा मारणारी अशा दोघी महिला अंदाजे ६० टक्के भाजल्या. दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
तर या दोघींना वाचविण्यास गेलेले त्यांच्या घराशेजारील किराणा विक्रेतेही किरकोळ भाजले असून त्यांना जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याविषयी पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना जालना भागात भवानीनगर परिसरात सिद्धिविनायक नगर भाग आहे. तेथे ताराबाई केशव जाधव यांच्या घराशेजारी त्यांच्या किरायेदार मिना दिलीप घारे राहतात. दोघींचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे आहे. शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मीना आपल्या घरात स्वयंपाक करत असताना गप्पांसाठी ताराबाई त्यांच्याकडे आल्या. गॅस ओट्यावर असला तरी मीना बाई सवयीप्रमाणे ओट्याला चिकटून स्वयंपाक करत होत्या.




