बुलढाणा

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यासाठी कटिबद्ध _आमदार मनोज कायदे.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, प्रतिनिधी गजानन खिल्लारे.

शिवा निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विकास कामात फार मोठे योगदान असून त्यांनी परिसरातील समस्या मांडव्यात त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून देऊळगाव राजा येथे प्रशस्त पेन्शन भवन साठी एक करोड रुपये निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार मनोज कायदे यांनी देऊळगाव राजा येथे तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या वतीने आयोजित पेन्शन डे कार्यक्रमात बोलताना दिले. विरंगुळा भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाचे मानत संचालक गोविंदराव अहिरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोज कायदे बुलढाणा जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष डॉक्टर मधुकरराव पऱ्हाड होते. इतर मान्यवर मध्ये चंद्रशेखर सदावर्ते, तेजराव साबळे, प्रा. रामदास शिंगणे, विनायक खराटे, रावसाहेब पुजारी, बळीराम मापारी, काशिनाथ खांडेभराड, धनीराम शिपने, स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक अंकुश रोडे, डॉ. अशोक काबरा, याप्रसंगी डॉ. मधुकर पऱ्हाड, धनशीराम शिपने, रावसाहेब पुजारी, गोविंदराव अहिरे, प्रकाश खांडेभराड, विजय रायमल, श्रीधर जगताप, प्रा. विनायक कुलकर्णी, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मधुकर धुळे, रमेश गवई, पंडितराव पाथरकर, कैलास शेळके, आशाताई शेळके, राम चौधरी, अरुण सपाटे, प्रा. प्रदीप मिनासे, प्रा. अशोक डोईफोडे, सर्जेराव वाघ, गजानन ढवळे, रंगनाथ सपाटे, सुशील हनुमंते, गोपाळराव बोरुळ, संजय वासलेकर, पूर्ण चंद्र जोशी, राजेंद्र गोरे, दत्ता कोरडे, मधुकर शेळके, नंदकिशोर बाहेती, रामदास कुलथे, मार्तंड आप्पा घिके, दशरथ नरोडे, मांटे सर, महमूद बेग, मुन्ना ठाकूर तथा इतर उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन रमेश नरोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button