Uncategorized

अवैध रेती टिप्परने महिलेला चिरडले रेती माफी यांची गुंडागर्दी बेलगाम; आझाद हिंद रस्त्यावर उतरणार; परिस्थिती तणावग्रस्त!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

सदर घटना जळगाव जामोद ते नांदुरा रोड वरील: अनधिकृत रेतीमाफी यांच्या भरधाव वेगाने अनधिकृत टिप्पर मुळे जिल्ह्यातील असंख्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर मृतांमध्ये मागील काळात भादोला येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तशीच दुर्दैवी घटना आज सकाळी नांदुरा रोडवर घडली आहे. सकाळी पती-पत्नी फिरायला गेले होते. त्या व्हिडिओ अनधिकृत रेती वाहतूक करणाऱ्या बेभान टिप्परने महिलेला धडक देऊन चिरडले. महिला जागीच गतप्राण झाली. अवैध टिप्पर चालक-मालक फरार झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे लगेच त्याच्या पाच मिनिटानंतर अनधिकृत टिप्पर सुरूही झाले. तसेच सर्व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर परिसरात घटनेमुळे खळबळ उडाली होती. मृतदेह पोस्टमार्टम साठी नांदुरा शासकीय रुग्णालयात जमा करण्यात आला. तर अद्यापही अवैध रेती वाहतूक पाच मिनिटे सुद्धा थांबली नाही. या अनुषंगाने आझाद हिंद शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून अनधिकृत रेती वाहतूक बंद करण्याची ततसेच संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button