Uncategorized

शेगावमध्ये चोरी; ४१ हजारांचा ऐवज लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या
मागील परिसरात घरफोडीची घटना घडली असून,
चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख
रक्कम असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल
चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी २२ नोव्हेंबर रोजी शेगाव पोलिस
ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
नोंदविण्यात आला आहे. शेख सरफराज शेख
अहमद (५२, रा. शेगाव) यांनी दिलेल्या
माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० ते १८
नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरात
ठेवलेले दागिने आणि पैसे कुणीतरी अज्ञात
चोरट्याने लंपास केले. चोरट्यांनी घरातील कपाट
फोडून ५ ग्रॅम सोन्याची पोत (किंमत अंदाजे
१५,००० रुपये), ६ ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे
(किंमत सुमारे ६,००० रुपये) व रोख रक्कम
२०,००० हजार रुपये, असा एकूण ४१,०००
रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी बीएनएस कलम
३०५, ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी
गाडगे करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button