बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
. प्र. ता. गजानन खिल्लारे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देऊळगाव येथील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात तिळगुळ येथील पोलीस चौकी माहितीसाठी निवेदन देऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन दिले. न्यायालयात सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला केला. ही घटना अत्यंत धक्कादायक व अस्वस्थ करणारी आहे. या निवेदनावर रणजीत खिल्लारे, अमोल इंगळे, बाबासाहेब साळवे, स्वप्निल शहाणे, अरविंद काकडे, बळीराम शिंगणे, निखिल शिंगणे, अमोल साळवे, अली कुरेशी, संदीप झिने, आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत.



