खानदेशजळगावा जिल्हापत्रकारमुक्ताईनगर

अखेर पत्रकार बांधवच बुजवणार भुसावळ रोडवरील खड्डा!

मुक्ताईनगर :
भुसावळ ते कोथळी रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा खड्डा पडलेला असून, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघाताची शक्यता देखील वाढली आहे.

या समस्येची वारंवार दखल घेत पत्रकार बांधवांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, मात्र संबंधित खात्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता पाहून अखेर पत्रकार बांधवांनी स्वतःच पुढाकार घेत, जनहितासाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्याचा उपक्रम :
मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, भुसावळ रस्त्यावरील तो जीवघेणा खड्डा पत्रकार बांधव स्वतःच्या पुढाकाराने बुजवणार आहेत.

या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करतात, पण यावेळी त्यांनी फक्त आवाज उठविण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीचा धडा दाखवला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button