*तेल्हारा तहसील वर २९ सप्टेंबर ला शेतकऱ्यांचा आसुड मोर्चा! मोर्च्यात शेतकरी, शेतमजूर व मोठ्या संख्येने सामाजीक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे ; प्रशांत डिक्कर.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.

तेल्हारा दि. २७ सप्टेंबर २०२५|
खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारला सडो कि पडो करु; प्रशांत डिक्कर! शेतकरी, शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात हा मोर्चा!
गत आठवड्यात विश्रामगृह तेल्हारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांवरील कर्ज वसुलीविरोधात मोठा ‘आसुड मोर्चा’ जाहीर केला. हा मोर्चा सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता टॉवर चौक ते तहसील कार्यालय, तेल्हारा या मार्गाने काढला जाईल. शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठीच्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे डिक्कर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत डिक्कर म्हणाले की, “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याची मागणी आम्ही ठामपणे करतो. कापूस, सोयाबीन व तुरीसारख्या पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव देण्यात यावे. शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळ स्थापन करावे. तेल्हारा तालुक्यातील गावांना वाण धरणातून तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा. सततच्या पावसामुळे, हुमणी अळी व येलो मॉझेकमुळे सोयाबीन उत्पादन प्रचंड घटले असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करावे. तसेच, शालेय पोषण आहारात केळीचा कायम समावेश करून केळी पिकाला हमीभावाचे धोरण ठरवावे. या मागण्यांसाठी शेतकरी व शेतमजूर एकजुटीने लढतील.
“प्रमुख मागण्या: – शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा:
बँका व आर्थिक संस्थांकडून होणारी कर्ज वसुली तात्काळ थांबवा.
प्रशांत डिक्कर यांनी आवाहन केले की, या मोर्च्यात शेतकरी, शेतमजूर व सर्व समाजकल्याणकार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मोर्चा शांततेने व शिस्तबद्धपणे काढला जाईल, यावेळी स्वराज्य पक्षाचे गणेश आमले, कुलदीप बाजारे, मुन्ना पाटील मनतकार यांच्या सह कार्यकर्ते व मोठ्या संख्येत विविध वृत्तपत्र व वृत्त वाहिनीचे प्रतीनीधी उपस्थित होते.



