महाराष्ट्र

अकोला अकोट मार्गावरील शहाणूर नदीवरील पुलाला दोन महिन्यात पडल्या भेगा…;

*अकोला अकोट मार्गावरील शहाणूर नदीवरील पुलाला दोन महिन्यात पडल्या भेगा…;*

*महामार्गावरील करोडी फाटा ते चोहोट्टा बाजार जवळील प्रकार ….

!* अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे

अकोट अकोला महा मार्गवर असणारे शहानूर नदीवरील पुलाला अवघ्या दोन महिन्यातच भेगा पडल्या. निकृष्ठ दर्जाचे काम असल्याने पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. त बाजूने पुलाची संरक्षक भिंत एक फूट बाजूला सरकून भराव खचत असून पुल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकृष्ठ व दर्जाहिन कामामुळे कोट्यावधी रूपये येणाऱ्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाणार आहेत. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. अकोला अकोट जाणाऱ्या मुख्य महा मार्ग वरील चोहोट्ट बाजार जवळील शहानूर नदीवरील नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. पुलाला जागोजागी तडे गेले असून दोन महिन्यातच या बोगस कामाचे पितळ उघडे पडले आहे बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाचे काम करण्यात आले. लोकप्रतिनिधी ,अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून थातुरमातुर पद्धतीने पुलाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या कामाचे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पुलाच्या दोन्हीही बाजूने मोठमोठे तडे जाऊन भेगा पडल्या आहेत. दोनच महिन्याच्या आत या पुलाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. उन्हाळ्याच्या काळातच ही बाब निदर्शनात आल्याने नव्याने पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात नदीच्या पुराने पूल वाहून जाण्याची शक्यता परिसरातील नागरिक करीत आहेत…… या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्या सोबत संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही….महामार्गावरील करोडी फाटा ते चोहोट्टा बाजार जवळील प्रकार ….!

अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे

अकोट अकोला महा मार्गवर असणारे शहानूर नदीवरील पुलाला अवघ्या दोन महिन्यातच भेगा पडल्या. निकृष्ठ दर्जाचे काम असल्याने पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. त बाजूने पुलाची संरक्षक भिंत एक फूट बाजूला सरकून भराव खचत असून पुल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकृष्ठ व दर्जाहिन कामामुळे कोट्यावधी रूपये येणाऱ्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाणार आहेत. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

अकोला अकोट जाणाऱ्या मुख्य महा मार्ग वरील चोहोट्ट बाजार जवळील शहानूर नदीवरील नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. पुलाला जागोजागी तडे गेले असून दोन महिन्यातच या बोगस कामाचे पितळ उघडे पडले आहे बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाचे काम करण्यात आले. लोकप्रतिनिधी ,अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून थातुरमातुर पद्धतीने पुलाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या कामाचे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पुलाच्या दोन्हीही बाजूने मोठमोठे तडे जाऊन भेगा पडल्या आहेत. दोनच महिन्याच्या आत या पुलाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. उन्हाळ्याच्या काळातच ही बाब निदर्शनात आल्याने नव्याने पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात नदीच्या पुराने पूल वाहून जाण्याची शक्यता परिसरातील नागरिक करीत आहेत……

या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्या सोबत संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button