बुलढाणामहाराष्ट्रवैद्यकीयसामाजिक
वरवट (खंडेराव )येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामसभा संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
रतन भगत,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी.
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला वरवट खंडेराव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेचे अध्यक्ष श्री रघुनाथ भाऊ गा ळकर हे होते ,तसेच वरवट खंडेराव चे सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव श्री सुभाष दुबेहे सुद्धा उपस्थित होते .या सभेचे प्रास्तावित श्री शिवशंकर भाऊ वासुदेव गाळकर यांनी केले .आपल्या प्रस्ताविक पर भाषणात शिवशंकर भाऊ गाळकर यांनी भारताचे पंतप्रधान मोदीजींच्या 75 व्या वाढदिवसाचा उल्लेख करत या अभियाना द्वारे आपल्या गावचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावर त्यांनी समस्त गावकऱ्यांचे लक्ष केंद्रित केले .तसेच वरवट खंडेराव ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे कोण कोणत्या घटकावर काम करणार आहे याची माहिती दिली. यामध्ये सुशासन युक्त पंचायतराज ,गाव पातळी संस्था सक्षमीकरण ,सक्षम पंचायत (स्वाधीनी व लोकसहभाग )उपजीविका विकास गृहनिर्माण सामाजिक न्याय ,जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, नरेगा व इतर योजना चे अभिसरण ,लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे ,नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे अशा प्रकारे वरील मुद्द्यावर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली .यामध्ये नियमानुसार या समितीचा अध्यक्ष हा सरपंच असतो परंतु सरपंच हा गावात हजर नसल्याकारणाने त्याऐवजी उपसरपंच श्री रघुनाथ भाऊ गडकर यांचीच या समितीचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .व उपाध्यक्ष म्हणून निलेश भाऊ गव्हाळे यांची निवड करण्यात आली .आणि सर्व गावकऱ्यांमधून सदस्यांची नियुक्ती करण्यात आली .यामध्ये सौ.राधा किसन इंगळे ,वसंत भास्कर गाळकर निलेश लक्ष्मण गव्हाळे ,काशिनाथ तानाजी तायडे, शेख मनोहर शेख आदम, सचिन नारायण खंडेराव ,अनिल श्रीकृष्ण तायडे ,महादेव पुंडलिक वरटकार ,प्रदीप रावणकार निर्मला रावणकर ,सुनीता इंगळे ,अस्मिता रतन भगत, शेख नजाकत ,सुरेश वरट कार ,अनंता गाळकर ,सागर कापसे ,उज्वला ढंबाळे ,मोनिका शिवा वरटकर ,प्रमोद काळे ,आशिष नवघरे ,निलेश खंडेराव ,शत्रुघ्न शालिग्राम गाळकर ,ज्ञानेश्वर मोहन बघेवारअशा इत्यादींची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. या वरील नेमण्यात आलेल्या समितीद्वारे गावाचा विकास निश्चित होईल अशी अपेक्षा करूया.
✍️



