खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणा

तालुकास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धा तेल्हारा येथे संपन्नमा.शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. अकोला व महाराष्ट्र इंग्रजी शिक्षक संघटना (मेटा) जिल्हा अकोला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

तालुकास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धा तेल्हारा येथे संपन्न
मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. अकोला व महाराष्ट्र इंग्रजी शिक्षक संघटना (मेटा) जिल्हा अकोला च्या वतीने तालुकास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धा दिनांक 15/ 9 /2025 ला डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय येथे संपन्न झाली.स्पर्धेचे उद्घाटन पं. स. तेल्हाराच्या गटशिक्षणाधिकारी मा. सौ सुनीता तळोकार (बकाल) मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले व प्रा. योगेश कोरपे सर होते. तसेच मेटाचे विभागीय उपाध्यक्ष श्री बळवंत गावंडे सर व मेटा चे तेल्हारा तालुका अध्यक्ष समाधान भालतिलक उपस्थित होते स्पर्धेकरिता तालुक्यातील मराठी माध्यमाच्या एकूण 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर इंग्रजी माध्यमाच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गट अ करिता “जलसाक्षरता काळाची गरज” तर गट ब करिता “जीवनातील विनोदाचे महत्त्व “हे विषय ठेवण्यात आले होते .
यामध्ये मराठी माध्यमाच्या गटातून प्रथम क्र. हनुमान प्रसादसहा जनता विद्यालय दानापूर ची विद्यार्थिनी कु.पंखुडी घनश्याम फाफट तर द्वितीय क्र. सैय्यद कमरुद्दीन उर्दू हायस्कूल तेल्हारा ची कु.आयुष्या खानम शेख आसिफ हिने तर तृतीय क्रमांक निळकंठ सपकाळ विद्यालय पाथर्डी ची कु. दिव्या सुनील मेसरे हिने मिळवला.
तर ब गट मधून सावित्रीबाई फुले विद्यालय बेलखेड ची कु.आदिती एस वानखडे द्वितीय क्र. हनुमान प्रसादसाह जनता विद्यालय दानापूर ची कु.आस्था भटकर हिने तर तृतीय क्रमांक नवयुग विद्यालय वाडी अदमपूर ची कु. प्राजक्ता नागे हिने मिळवला
इंग्रजी माध्यमाच्या अ गटातून वेळेवर चिठ्ठी काढून विषय देण्याच्या वकृत्व स्पर्धेकरिता प्रथम क्र. सेंट पॉल स्कूल हिवरखेड ची विद्यार्थिनी कु. खुशबू तन्ना हिने तर द्वितीय क्र. स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा च्या कु. कौशिकी अमरीश रावल व तृतीय क्र. गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा ची कु. सुहानी कपिल चांडक हिने मिळवला तर ब गटातून प्रथम क्र. सेंट पॉल स्कूल हिवरखेड ची कु. आयुषी अनिल गावंडे हिने तर द्वितीय क्र. गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा चा अरकान शहा अझहर शहा यांने तर तृतीय क्र. स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा च्या कु. वेदिका विनायक जाधव हिने मिळवला .
प्रत्येक गटातून
प्रथम क्र.च्या विजय स्पर्धकातून दिनांक 23/ 9/ 25 ला श्री शिवाजी हायस्कूल हरिहर पेठ अकोला येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धेकरिता निवड करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी मा. गटशिक्षणाधिकारी सौ. सुनीता तळोकार मॅडम व डॉ. गोपाल ढोले श्री कोरपे सर यांनी मार्गदर्शन करून विजेत्या विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व सौ सुनिता तळोकार (बकाल) मॅडम यांच्यातर्फे रोख रक्कम १२०० रुपये विजेच्या स्पर्धकांना देऊन गौरविण्यात आले
स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण श्री श्याम गणेश पाठक सर जि.प. प्राथमिक शाळा मालठाणा व प्रा.श्री अभय मोहळे सर विवेकवर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय भांबेरी यांनी केले. हा कार्यक्रम अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या नेतृत्वात संपन्न झाला
कार्यक्रमाला मेटा चे विभागीय अध्यक्ष श्री डी बी म्हैसने सर उपाध्यक्ष महेंद्र कराळे , बळवंत गावंडे जिल्हाध्यक्ष अनंत मसने यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाकरिता तालुक्यातील मेटाचे उपाध्यक्ष श्री पवन सोयाम, विवेक बिडवे, रमेश राठोड, संतोष आले ,अच्युत मोरे, मनोज तराळे ,संतोष वाडेकर ,अझर शहा, बळीरामजी कुवारे ,श्री रोठे सर सौ दामदार मॅडम तेल्हारकर मॅडम, कोरडे मॅडम, नाविद मोहम्मद सर श्री सरकटे सर आदी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेटाचे तालुका अध्यक्ष श्री समाधान भालतिलक यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री अच्युत मोरे सर व श्री संतोष ताले सर यांनी केले. आभार प्रदर्शन मेटा तालुका उपाध्यक्ष श्री रमेश राठोड सर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button