आज गुरुवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार
आज गुरुवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण
” व्हॉईस ऑफ मीडिया ” आयोजित* ऊर्दू भाषिक पत्रकारांचे राष्ट्रीय सम्मेलन 2023 **व्हॉईस ऑफ मीडिया च्या ऊर्दू विंग तर्फे ऊर्दू माध्यमाच्या देशभरातील पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन 24 सप्टेंबर 2023 रोजी जळगाव येथे ईकरा महाविद्यालय, मेहरूण मध्ये आयोजित करण्यात आले आहे. दिवस भर चालणाऱ्या या संमेलनात देशभरातील ऊर्दू माध्यमाचे पत्रकार सहभागी होणार आहेत. सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत हे सम्मेलन दोन सत्रात होणार आहे. पत्रकारांची राष्ट्रव्यापी संघटना म्हणून नावारुपाला आलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने हे सम्मेलन आयोजित केले असून यात पत्रकारीते समोरील आव्हाने आणि पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा होणार आहे. या संमेलनाला जिल्हातील मंत्री महोदय, स्थानिक लोकप्रतिनिधी, माध्यम क्षेत्रातील नामवंत पत्रकार उपस्थित राहून मार्ग दर्शन करणार आहेत. हे सम्मेलन पूर्णपणे पत्रकार आणि पत्रकरिता या विषयावर केंद्रित असणार आहे. या संमेलनाची सविस्तर माहित देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल प्रतिनिधी पाठवून मान्यवर आम्हाला उपकृत करावे, ही आग्रहाची विनंती . ही पत्रकार परिषद आज गुरुवारी दुपारी ठीक ४ वाजता शहरातील पद्मालय विश्राम गृहात होणार आहेधन्यवाद…! आपला विश्वासूमुफ्ती हारून नदवीराष्ट्रीय अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया ऊर्दू विंगजळगाव.२१/०९/ २०२३…



