जळगावा जिल्हामहाराष्ट्र

संग्रामपूर तालुक्यातील केंद्रीय शाळा वरवट खंडेराव येथे शाळेचा दुसरा गणवेश वाटप!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
रतन भगत,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी.

     सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक 15 /9/ 2025 रोज सोमवारला जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वरवट (खंडेराव )तालुका संग्रामपूर येथे विद्यार्थ्यांना मोठ्या उत्साहामध्ये शाळेचा दुसरा गणेश वाटप करण्यात आला. गणवेश वितरित करीत असताना ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंतभाऊ गाळकर ,उपाध्यक्ष गोपाळ भाऊ इटेवार, व समिती सदस्य व समस्त गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री वसंता भाऊ वाडकर यांनी शालेय प्रगतीमध्ये सन 2023 ते 24 मध्ये 65 पटसंख्यावरून आज रोजी वरवट (खंडेराव )शाळेची वर्ग एक ते सात ची पटसंख्या 88 वर पोहोचली आहे .यामध्ये केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक श्री दिनेश तायडे सर ,मुख्याध्यापिका कुमारी माधुरी हरणे ,श्री प्रमोद काळे सर ,श्री भरत मोरे सर या सर्वांचे बहुमोल योगदान आहे .आजच्या या दिनी शालेय इमारतीची सुंदर रंग रांगोळी केलेली होती .सोबतच या शाळेत वीस गुंठे खेळाचे मैदान सुद्धा उपलब्ध झालेले आहे .शाळेचा सर्व परिसर स्वच्छ व सुंदर आणि रमणीय बनलेला आहे .शाळेमध्ये गुणवत्ता पूर्ण व व डिजिटल स्वरूपामध्ये अध्ययन व अध्यापन सुरू असते .दैनिक परिपाठामध्ये विद्यार्थी संपूर्ण संवाद व एका शब्दावर वीस ते तीस वाक्य इंग्रजी मध्ये बोलतात.
         या सर्व कारणांमुळे वरवट (खंडेराव )या गावात शिक्षकांविषयी विशेष आपुलकी व सहानुभूती निर्माण झालेली आहे ,व या शाळेची पटसंख्या सुद्धा याच कारणामुळे सतत वाढत चाललेली आहे.
                       तसेच महत्त्वाचे म्हणजे नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीचे बहुमोल योगदान शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वसंता भाऊ गाळकर, उपाध्यक्ष गोपाल इटेवार,व समस्त समिती सदस्य यांचे रूपाने लाभले असल्याकारणामुळेच लवकरच वरवट खंडेराव येथील पडक्या व धोकादायक शाळेच्या इमारतीचे रूपांतर पक्क्या इमारति मध्ये आपणास उपलब्ध होणार आहे ,यामध्ये प्रशासनाचे अनमोल असे सहकार्य अपेक्षित आहे.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button