जनुना तलाव येथे साकारला गणेश घाट..

जी.डी. रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव-सार्वजनिक धार्मिक उत्साहापैकी गणेश उत्सव व दुर्गा उत्सव तसेच जगदंबा उत्सव मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये साजरे केले जातात. त्यामुळे मुर्त्या विसर्जनासाठी सुरक्षित जागा म्हणून आता शहरापासून जवळच असलेल्या मौजे जनू ना तलाव येथे तब्बल 1 कोटी खर्च करून गणेश घाट साकारला आहे. ही संकल्पना राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्याच विशेष प्रयत्नातून जनुना येथे गणेश घाटाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या गणेश उत्सवाचा माहोल पाहता शहरानजीक जणूना तलाव येथेही मूर्ती विसर्जनाची व्यवस्था म्हणून गणेश घाटाचे काम करण्यात आले आहे. शहरापासून खूपच कमी अंतरावर असलेल्या मौजे जनु ना तलावावर नव्याने करण्यात आलेला घाट श्री गणेश घाट म्हणून ओळखल्या जाणार आहे. त्यामुळे यंदा गणेश मंडळांना आपल्या भव्य दिव्य मूर्त्यांचे विसर्जन करण्यासाठी सुरक्षित स्थळ म्हणून गणेश मुर्त्या विसर्जनासाठी गणेश घाट हा महत्त्वाचा ठरनार आहे. या तलावावर स्थानिक नगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष ठेव ल्या जाणार आहे. तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी या घाटावर विद्युत दिव्यांची सोय सुद्धा केली जाते गणेश घाटामुळे गणेश भक्तामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे….✒️



