बुलढाणामहाराष्ट्र

आज शेगावात धम्म ध्वज यात्रेचे आगमन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चीप

शेगाव :- २१/८/२५ रोजी शहरातून निघणार भावी रॅली महाबोधी बुद्धविहार मुक्तीच्या
आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वात नागपुर ते मुंबई अर्थात दिक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी महाधम्म रॅली आयोजीत करण्यात आलेली आहे. ही रॅली उद्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता शेगाव शहरातील मिलींद नगर तिन पुतळे परीसरात दाखल होत असून दुपारी १२:३० वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरुन मार्गक्रमण करत पुढील प्रवासाकरीता खामगावकडे प्रस्थान करणार आहे.

बिहार राज्यातील बौद्धगया महाविहार मुक्तिसाठी संपुर्ण देशभरात विविध सामाजीक, राजकीय, धार्मीक संघटनेच्या माध्यमातून लढे उभारल्या जात आहेत. त्याच लढ्याच्या अनुषंगाने भंते विनाचार्य हे आघाडीवर आहेत. त्यांच्या नेतृत्वात भन्ते के. के. राहुल, भन्ते सुमीत रत्न यांच्या पुढाकाराने हा लढा पुनश्च सुरु झाला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, भिमराव आंबेडकर व सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन सुरु झालेले आहे. या रॅलीमध्ये जवळपास दोनशे भन्ते उपस्थित राहणार आहेत. तरी शेगाव शहर व परिसरातील सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करुन रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन शेगाव शहर आयोजन समीतीने केले आहे,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button