बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसंपादकीय

सूर्योदय बालगृहातील मुलांसोबत निस्वार्थ रुग्णसेवा परिवाराकडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न! स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी

मलकापूर /अकोला |
सर्वत्र प्रसिद्ध होत असलेला, निस्वार्थ रुग्णांची सेवा करणारा तसेच विविध उपक्रम राबवणारा “निस्वार्थ रुग्ण सेवा परिवार ” . या निस्वार्थ रूग्ण सेवा परिवाराकडून मलकापूर येथील
सूर्योदय बालगृहात मुलांसाठी राबवण्यात आलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला . हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश बालगृहातील मुलांना भाऊ -बहिणीचे प्रेम लाभावे तसेच बहिण -भावाचे हे नाते खूप मौल्यवान असते याची जाणीव व्हावी याकरिता रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सौ.अर्चनाभाभी शर्मा, प्रमुख पाहुणे सौ.चंदाताई शर्मा (माजी महिला मोर्चा महानगराध्यक्ष तथा महानगर उपाध्यक्ष भाजपा), महिला मोर्चा महानगराध्यक्ष भाजपा सौ.वैशालीताई शेळके, माजी महापौर तथा नगरसेविका सौ.सुमन ताई गावंडे, खडकी मंडळाध्यक्ष सौ प्रणिता समरीतकर, महानगर सचिव सौ.अस्मिता वगारे, सौ.उज्वला भरणे, सौ‌.अश्विनी महानकार, सौ.माया मेंढे, सौ.शिका तायडे, सौ.लीना चिम, सौ.सुषमा जावंदिया, सौ.सपना मगर, गौरी सरोदे, प्रमुख उपस्थिती प्रभाग क्र. २० चे नगरसेवक श्री.विनोद मापारी, अभिजित मुळे, संग्राम इंगळे, विशाल गुंजाळे, जाधव सर, यश गिरे, श्री.राजु वगारे, सचिन देशमुख, विजय टोळे, अमोल क्षिरसागर, रविन्द्र येवतकर, सचिन सातपुते यांचे सह आदींची याप्रसंगी उपस्थिती होती . कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन सविता शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन निस्वार्थ रूग्णसेवा परिवार संस्थापक सचिव अतुल भांगे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button