धक्कादायक बातमी समोर येत आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी मरणाच्या दारात.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अरुणा दत्तात्रय खंडागळे चिखली सर्कल ग्रामीण भाग
दिनांक 18/ 8 /2025 रोजी धक्कादायक बातमी समोर येत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेताचे नुकसान झाले आहे
टाकरखेड मुसलमान येथील एकनाथ तानाजी ढवळे यांच्या शेतात संपूर्ण पावसाने घेर घातला आहे संपूर्ण शेतात पाणीच पाणी तुंबले आहे सर्व पिकाचे नुकसान झालेल आहे शेतकऱ्याने शेतामध्ये जवळचे होते नव्हते सर्व काही टाकले आहे शेतकरी हा निराश होऊन बसलेला आहे कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर खूप नुकसान झालेला आहे
अतिवृष्टीमुळे शेतामध्ये संपूर्ण पाणी थांबले आहे पीक संपूर्ण वाहून गेलेले आहे पिकाची पूर्ण नासाडी झालेली आहे शेतकऱ्यांच्या आता हातात आता कोणताही पीक उरलेलं नाही
शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी



