मुक्ताईनगरी महाकालच्या भक्तीत रंगली भव्य कावडयात्रेत हजारो भाविकांचा सहभाग

मुक्ताईनगर शहरात आज सोमवार दि.१८ रोजी भव्य महाकावड यात्रेचे आयोजन आ. चंद्रकांत पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे होते.कावड यात्रेत अघोरी सजीव देखाव्याने तसेच भव्यकाय महादेव आणि हनुमान मूर्तीने देखील लक्ष वेधून घेतले होते.
शहरात ठीकठिकाणी कावड यात्रेच्या स्वागतासाठी डिजिटल बॅनर व भगवे ध्वज लावून सजावट करण्यात आली होती. कावड यात्रेचा प्रारंभ संत मुक्ताई मुळ मंदिर कोथळी येथून दुपारी २ वाजता झाला. यानंतर नवीन कोथळी , गजानन महाराज मंदिर ते प्रवर्तन चौक , एस टी स्टँड ते नागेश्वर मंदिर जुनेगाव भव्य मिरवणूक निघाली होती नागेश्वर मंदिर जुनेगाव येथे कावड यात्रेची सांगता झाली. कावड यात्रेची सांगता झाल्यानंतर सायंकाळी ७ :३० वाजता प्रवर्तन चौकातील शिवसृष्टी समोर सुप्रसिद्ध भजन गायिका, भगवाधारी फेम शहनाज अख्तर यांचा गायनाचा कार्यक्रम सुरुवात झाली आहे.
या कावड यात्रेमध्ये प्रमुख आकर्षण डीजे लाईट शो, अघोरी टीम आणि महाकाल ढोल पथक यांचे दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा , गच्चीवर थांबून अनेक महिला भगिनींनी कावड यात्रेचा याची देही याची डोळा अनुभव घेतला.तसेच ठिकठिकाणी कावड यात्रेची अतिशय भक्ती भावाने पूजा करण्यात येत होती.
कावड यात्रेत आमदार चंद्रकांत पाटील, माफदा अध्यक्ष विनोद तराळ ,तालुका प्रमुख नवनीत पाटील,शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मराठे , तालुका प्रसिद्धी प्रमुख निलेश मेढे,युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, शिवसेना शहर प्रमुख प्रशांत टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील , व्यापारी आघाडी अध्यक्ष नितीन जैन, संजय काळे, शिवाजी पाटील, नगरसेवक मुकेश वानखेडे , निलेश शिरसाट ,वसंत भलभले , बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक प्रितेश बरडिया, सुनील बोरसे , पंकज कोळी, यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी तसेच शिव भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीच्या यशस्वितेसाठी प्रकाश गोसावी, सचिन पालवे, जितेंद्र मुऱ्हे, राहुल धनगर, गणेश पाटील, सचिन उर्फ पिंटू पाटील यांच्यासह असंख्य युवा सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.



