अकोलाजळगावा जिल्हाबुलढाणाशैक्षणिकसांस्कृतिक

*लो.शाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालय तेल्हारा येथे ७९ वा स्वतंत्रता सोहळा उत्साहात संपन्न! *स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी*

तेल्हारा शहरातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १५ ऑगष्ट २०२५ रोजी ७९ वा स्वतंत्रता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपरिषद वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल श्रीकृष्ण पोहरकार, मार्गदर्शक संतोष साबळे, संस्थापक अध्यक्ष नागोरावजी वानखडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रथमतः मान्यवरांनी प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवाला आदरांजली अर्पण केली. त्यानंतर महाराष्ट्र शासन ग्रंथ मित्र पुरस्कृत रामेश्वर पोहेकर यांचे हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी रामेश्वर पोहेकर यांनी उपस्थित सर्व वाचक सभासद ग्रंथप्रेमी तथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी-विद्यार्थिनी बालवाचक यांना वाचाल तर वाचाल या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीकृष्ण पोहरकर यांनी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या स्वातंत्र्य- समता -बंधुता व न्याय या तत्त्वाचे जर सर्वांनी पालन केले तरच आपण जीवनाचं सार्थक करू शकाल असे मोलाचे मार्गदर्शन केले. संतोष साबळे यांनी सुद्धा स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले. व स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला कैलास भटकर, शहादेव बावणे, दिनेश शेळके ,प्रमिला वानखडे,विमल वानखडे ,सुनील कवळे ,गजानन हागे ,सर्व वाचक सभासद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमा मध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बबन दुतोंडे यांचे होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button