जळगांव जामोद ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा गरीब लोकांवर प्रायव्हेट हॉस्पिटल ची वेळ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
दिनांक 6/8/2025 रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या औषधांचा आणि इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या, इंजेक्शन यासारख्या अत्यावश्यक वस्तू उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
सरकारकडून ग्रामीण रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र तरीही सुद्धा औषधांसाठीही नागरिकांना बाहेरची धावपळ करावी लागत आहे. अनेक वेळा रुग्णालयातून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने रुग्णांचे हाल होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष या गंभीर स्थितीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याची चर्चा आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून, या प्रकाराकडे प्रशासन गंभीर्याने लक्ष देणार का? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
जनप्रतिनिधींनी लक्ष द्यावे!
स्थानिक आमदार संजय भाऊ कुटे व जनप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गंभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. गरिबांसाठी असलेले रुग्णालय जर त्यांच्या उपचारासाठी अपुरे ठरत असेल, तर शासनाचे आरोग्य धोरण केवळ कागदावरच मर्यादित राहत आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत
✍️



