महाराष्ट्र

हिवरखेड मंडळ भारतीय जनता पक्षाची जंबो कार्यकारिणी घोषित.

हिवरखेड (वार्ताहर )
अकोला जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या हिवरखेड मंडळ भारतीय जनता पक्षाची जंबो कार्यकारिणी आमदार रणधीरजी सावरकर सरचिटणीस महाराष्ट्र, पालकमंत्री आकाशभाऊ फुंडकर, आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, खासदार अनुपजी धोत्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोषजी शिवरकार यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनात हिवरखेड मंडळ भाजपचे अध्यक्ष मंगेश दुतोंडे यांनी जाहीर केली आहे.या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून सौ. रेखा पुरुषोत्तम कुटे, गोपाल अरबट, राजु पाटील गावंडे, सौ. प्रतिभा विरेंद्र येऊल, सौ. साधना गजराज सेंगर, दिपक वाघमारे, सरचिटणीस म्हणून पुंजाजी मानकर, संदिप पालिवाल, चिटणीस म्हणून सौ. वैशाली नितीन भुडके, वैभव पोटे, सौ. राजकन्या भानुदास इंगळे, सुनिल अस्वार, गोपाल महारनर, निलेश बोदडे कोषाध्यक्ष म्हणून पद्माकर आखरे प्रसिद्धी प्रमुख म्हणून बाळकृष्ण नेरकर यांची तर किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बाजारे महिला मोर्चा अध्यक्ष सौ. शोभाताई तन्ना, युवा मोर्चा अध्यक्ष सागर ढाकरे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष जगतराम पांडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय हिवराळे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष संजय भिलावेकर, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष अन्सारोद्दीन बहारोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सदस्य म्हणून भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेण्यात आले आहे. या कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात भाजपचे विचार व कार्य घराघरात पोहोचवून भाजप बळकट करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button