डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार तेल्हारा येथील ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर यांना बहाल!

विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा| ज्ञानदानात आयुष्य खर्ची घालणारे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर यांनी ग्रंथालयीन चळवळीच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षापासून ग्रंथालय शैक्षणिक तथा सामाजिक ,प्रबोधनात्मक कार्य करून चर्चासत्रे ,शिबिर ,अधिवेशन , व्याख्यानमाला ,कवी संमेलन , मानवी जीवनात वाचनाचे महत्त्व या विषयावर परिसंवाद वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध उपक्रम राबविले.
त्यांच्या अनेक काव्यरचना स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे त्यांचा धार्मिक कार्याच्या बाबतीत सुद्धा सिंहाचा वाटा आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अद्याप पर्यंत बौद्ध पद्धतीने लग्नविधी आचार्य पद स्वीकारून तब्बल २००० लग्नाचा टप्पा पार पाडलेला आहे. अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो पोहेकर गुरुजींच्या याच कार्याची दखल घेत समाज प्रबोधनात्मक कार्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी नुकताच त्यांना नागपूर येथील मधुरम सभागृह विदर्भ हिंदी साहित्य संमेलनात नॅशनल विदर्भ आर्ट सोशियल कॉन्फरन्स तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले . डॉक्टर रवींद्र कोल्हे फेमस सोशियल वर्कर मेळघाट अमरावती मोरेश्वर निस्ताने प्रसिद्ध फिल्म संगीत निर्देशक तथा गायक अमृत प्रतिष्ठान नागपूर, डॉक्टर प्रशांत गायकवाड गिनीज रेकॉर्ड धारक, मोनिका फिटर दातास प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या नवी मुंबई, जगदीश भद्रे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, डॉक्टर डी.एन.खरात समृद्धी प्रकाशन पुणे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला .
यावेळी त्यांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आला .ही अतिशय कौतुकास्पद बाब असून हल्ली संपूर्ण पंचक्रोशीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



